प्रतिनिधी/ निपाणी
गेल्या महिन्याभरात निपाणीसह परिसरात कोरोना रुग्णांबरोबरच बळींची संख्यादेखील वाढत चालली आहे. गेल्या 4 दिवसांत शहर व परिसरात 4 हून अधिक बळी गेले आहेत. यामध्ये पट्टणकुडी येथील महिला, अकोळ येथील पुरुष तसेच निपाणी येथील कोरवी गल्ली व जत्राट वेस येथील कोरोनाग्रस्ताचा समावेश आहे.
याबरोबरच परिसरात दररोज पंधराहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र याबाबतची अधिकृत आकडेवारी प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवत नसल्याने नागरिक गाफील राहत आहेत. याचा परिणाम म्हणून संसर्गाचा धोका अधिकच वाढला आहे. निपाणी शहरात सोमवारी तीन रुग्ण आढळून आले. यामध्ये अकोळ रोड येथील 39 वर्षीय महिला, प्रभात टॉकीजनजीक 59 वर्षीय पुरुष व बादल प्लॉट येथील 70 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा फैलाव वाढत आहे. अशातच ग्राम पंचायतींचा कालावधी संपल्याने प्रशासकीय सत्ता असलेल्या अधिकाऱयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनजागृती करण्याची मागणी होत आहे.
हुक्केरी तालुक्यात 37 जणांना कोरोना
हुक्केरी : आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हुक्केरी तालुक्यातील 37 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये तालुक्यातील पाच्छापूर येथे 8, बस्सापूर येथे 6, संकेश्वर 5, बगरनाळ 3, करगुप्पी 3, चिक्कलदिनी 2, हगेदाळ 2, मावनूर 2, अरळीकट्टी 1, राजकट्टी 1, यमकनमर्डी 1, घोडगेरी 1, नंदीगुडीकेतर 1, अंगरीहाळ येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गोकाक, मुडलगी तालुक्यात 40 रुग्णघटप्रभा : सोमवारी गोकाक व मुडलगी तालुक्यातील 40 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्याधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी दिली. यापैकी गोकाक शहरातीलच 25 रुग्णांचा समावेश आहे. तर अंकलगी येथे 3, घटप्रभा 2, अकतंगेरहाळ 2, कोळवी, मरडीमठ, राजापूर गावात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वांना गोकाक येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.