प्रतिनिधी / बेळगाव
नियती फौंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱया महिलांचा सत्कार करण्यात आला. हॉटेल ईफा येथे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून रोहिणी गोगटे व नवीना शेट्टीगार उपस्थित होत्या.
नियतीच्या संचालिका सोनाली सरनोबत यांच्यातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी नियतीच्या कार्याची माहिती दिली. सत्कारमूर्तींची ओळख किशोर काकडे व शर्मिला संभाजी यांनी करून दिली. यावेळी लोकायुक्तच्या पोलीस प्रमुख यशोदा वंटगोडी यांनी महिलांना मार्गदर्शन केले व आपले अनुभव कथन केले.
या दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून दुर्गम भागातील दहा महिलांना शिवणयंत्रे देण्यात आली. या महिला दुर्गम भागातील असल्याने त्या येवू शकल्या नाहीत. मात्र त्यांच्या घरी शिवणयंत्रे पोहोचविली जातील, असे सांगण्यात आले. सुजाता गावडे, लक्ष्मी पाटील, बेबी नाईक, सावित्री कक्केरी, राजक्का माळी, कविता देसाई, महादेवी मठपती, लीला पाटील, मीनाक्षी गवळी, वासंती नाईक यांना शिवणयंत्रे देण्यात येणार आहेत.
संस्थेच्या सचिव मोनाली शाह यांनी आभार मानली. वंदे मातरम्ने सांगता झाली.