भाजी मार्केटमधील भाजी विपेत्या स्त्राr-पुरुषांना स्टीलचे ग्लास वाटप
प्रतिनिधी / बेळगाव
पर्यावरणाचा आणि स्त्राrचा घनि÷ संबंध आहे. तिने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला तर खऱया अर्थाने पर्यावरण सुरक्षित राहील, याच हेतूने पर्यावरणप्रेमी आरती भंडारे यांनी सोमवारी सकाळी अनोखा उपक्रम राबवून अभिनव पद्धतीने महिला दिन साजरा केला.
आरती भंडारे बुंद फौंडेशनच्या संचालिका आहेत. पाणी वाचविणे आणि पर्यावरण अबाधित राखणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्या मानतात. शहरात सध्या सर्वत्र कचरा गोळा करून तो जाळण्याचा प्रकार सर्वत्र होतो. या कचऱयात चहा पिलेले कागदी आणि प्लास्टिकचे ग्लासही जाळले जातात. परंतु हे ग्लास पूर्णतः नष्ट होत नाहीत. त्यांचे विघटन होत नाही. त्यामुळे या ग्लासचा वापर टाळणे आवश्यक आहे.
शहरातील भाजी विपेत्यांना चहा याच ग्लासमधून दिला जातो. हे लक्षात घेऊन आरती भंडारे यांनी सोमवारी सकाळी शहरातील विविध भाजी मार्केटमधील भाजी विपेत्या स्त्राr-पुरुषांना स्टीलचे ग्लास दिले व चहासाठी याच ग्लासचा उपयोग केला जावा, असे सांगून त्यांना मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी प्रात्यक्षिकही सादर केले आणि कागदी किंवा प्लास्टिकचे ग्लास आरोग्याला कसे हानीकारक आहेत, याबद्दल माहितीही दिली. त्यांच्यासमवेत शमा कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनीही महिलांना स्टील ग्लास वापरण्याचे महत्त्व सांगितले.
आम्हाला या प्लास्टिक व कागदी ग्लासचे धोके माहिती नव्हते. आजपासून आम्ही स्टीलच्या ग्लासमधून चहा पिण्यास सुरुवात करू, अशी ग्वाही महिलांनी दिली. या परिसरात जे चहा विपेते आहेत त्यांनासुद्धा आरती भंडारे यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्यांनाही 50 ग्लास दिले.