वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 12 बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांचा (एनबीएफसी) परवाना रद्द केला आहे. आरबीआयकडून दिलेल्या माहितीनुसार एनबीएफसीचा परवाना आरबीआय कायदा 1934 नुसार कलम 45-आय सेक्शन एच्या नियमानुसार काम करत नसल्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासोबत अन्य 9 एनबीएफसीने आपला परवाना स्वतः सादर केला आहे. या कंपन्यांनीही ही कार्यवाही कायद्याप्रमाणे केली नसल्याचे समोर आले आहे.
2019 मधील स्थिती
आर्थिक वर्ष 2019 मध्ये 1851 एनबीएफसीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक कंपन्यांकडून नियमावलीचे पालन न केले गेल्यास सदर कंपन्यांचा परवाना रद्द करत आली आहे.
खालील कंपन्यांची नेंदणी रद्द
? जयभारत पेडिट लिमिटेड, मुंबई
? दानी लिजिंग लिमिटेड, दिल्ली
? होनहार इन्वेस्टमेंट लिमिटेड, कालकाजी एक्सटेंशन, दिल्ली
? प्रोफिशिएन्ट लिजिंग ऍण्ड फायनान्स लिमिटेड, इलाहाबाद
? प्राईम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड , कोलकाता
? आशुतोष सिक्मयुरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, दिल्ली
? भारत फायनान्स ऍण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड, कोलकाता
? आंचल लिजिंग प्रायव्हेट लिमिटेड, मायापुरी, दिल्ली
? सिग्नेचर फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, गुरुग्राम, हरियाणा
? डी.बी.लिजिंग ऍण्ड हायर पर्चेज प्रायव्हेट लिमिटेड, जालंधर
? जिंदाल फिनलीज प्रायव्हेट लिमिटेड, नाभा पंजाब
? बीएलएस इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, कोलकाता
? हेल्प फायनान्स लिमिटेड, अमृतसर
? ऍजकोट ऍडव्हान्स लिमिटेड, लुधियाना