नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रविवारी दुपारी 2 ते 5 या कालावधीत राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात ‘नीट’ पार पडली आहे. देशभरातील 202 केंद्रांवर ती घेण्यात आली. या परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कठोर कोरोना नियमावली या परीक्षेसाठी लागू करण्यात आली होती. तसेच वेषसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यग्नात आले होते. तरीही विद्यार्थीवर्गात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
विद्यार्थ्यांनी कॉपी किंवा अन्य गैरप्रकार करु नयेत म्हणूनही दक्षता बाळगण्यग्नात आली होती. पूर्ण बाहय़ांचे शर्ट किंवा वेष परिधान करण्यास बंदी होती. बूट, किंवा तत्सम पादत्राणेही घालण्यास बंदी होती. विद्यार्थिनींना मोठय़ा प्रमाणात नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) केलेले वेष परिधान करण्यग्नावर निर्बंध लावण्यात आले होते. केसात फुले किंवा माळा घालणे, ब्रुचेस किंवा मोठी बटणे असणारे वेष घालण्याची अनुमती नव्हती. मात्र, लो हिल सँडल्सना अनुमती होती. कर्ण आभूषणे (इयररिग्ज), नोज रिंग्ज, पेंडंट्स्, नेकलेस, ब्रेसलेट्स् आणि पैंजण (अँकलेट्स्) यग्नांवर बंदी होती. पुरुष स्पर्धकांसाठीही विविध कठोर नियम होते. त्यांनाही पूर्ण बाहय़ांचे शर्ट किंवा वेष घालण्यावर बंदी होती. झिप पॉकेट्स्, मोठी बटणे, तसेच मोठे नक्षीकाम केलेले वेष न घालण्याचाग्न नियम होता. प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझर व इतर सुरक्षा साधने उपलब्ध केली गेली होती. तथापि, या परीक्षेसाठी असणारी वेषसंहिता हा साऱयांच्या चर्चेचा विषय झाला होता. यावर बरीच मतमतांतरे व्यक्त होत होती.