बेळगाव / प्रतिनिधी :
रामतीर्थ नगर येथील नेक्स्टअस डान्स ऍकॅडमीच्या सदस्यांनी नुकताच पश्चिम बंगाल येथे झालेल्या इंडो एशियन इंटरनॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यांनी सादर केलेल्या वेस्टर्न हिपपॉप डान्सला परीक्षकांची पसंती मिळाली.
एकूण 15 डान्सर्स यामध्ये सहभागी झाले होते. दणकेबाज डान्स सादर करीत त्यांनी हे यश मिळविले आहे. यापूर्वी त्यांनी गोवा येथे झालेल्या साऊथ इंडिया डान्स फॉर चॅम्पियनशीप स्पर्धेतही यश मिळविले आहे. नागेश मंडोळकर यांनी या डान्सची कोरिओग्रॉफी केली होती.