वृत्तसंस्था/मुंबई
भारताच्या समृद्ध आणि बहुविध संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी नेटफ्लिक्स हा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि युनेस्को या संस्थांनी एकत्रित योजना आखली आहे. या कार्यक्रमांतर्गत भारताच्या प्राचीन ते अर्वाचिन संस्कृती आणि इतिहासातील विविध प्रसंगांचे चित्रण प्रदर्शित करण्यात येणार आहे. ग्रीन गोल्ड ऍनिमेशनद्वारा उत्पादित ‘मायटी लिटल भीम’ ही मालिका दाखविण्यात येणार आहे. या मालिकेत ‘भीम’ नामकाच्या बालकाची धाडसी कृत्ये चित्रीत करण्यात आली आहे. ‘एक देश, अभुतपूर्व विविधता’ (वन नेशन इनक्रिडिबल डायव्हर्सिटी) या मालिके अंतर्गत भारताचा सांस्कृतिक प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पहिला व्हिडिओ 75 व्या स्वातंत्र्यदिनी प्रसारित केला जाणार आहे.