बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाकाळात रेल्वेची प्रवासी वाहतूक कमी झाल्याने रेल्वेने मालवाहतुकीकडे लक्ष पुरविले आहे. यामुळे रेल्वेला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळू लागला असून वेळेत मालाची वाहतूक होत असल्याने व्यापारीही खुष आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने एप्रिल 2021 मध्ये तब्बल 244 कोटी 86 लाखांचा महसूल जमा केला आहे. मागील वषीच्या तुलनेत यावर्षी 73 टक्क्मयांनी अधिक महसूल जमा झाल्याची नोंद झाली आहे.
प्रवासी वाहतूक बंद झाल्यापासून नैर्त्रुत्य रेल्वेने पार्सल रेल्वे सुरू केल्या. लोखंड, साखर, सिमेंट, खते, स्टील, बॉक्साईड यासह इतर साहित्याची वाहतूक करण्यात आली. हुबळी विभागातून दररोज 1 हजार 392 डब्यांमधुन 2.796 मेट्रिक टन मालाची वाहतूक एप्रिल महिन्यात करण्यात आली. 2020 च्या एप्रिल महिन्यात 140 कोटी रूपयांचा महसूल जमा करण्यात आला होता. यावषी तो 244 कोटींवर पोहचला आहे.
एप्रिल महिन्यात 0.854 मेट्रीक टन लोखंड, 0.105 मेट्रीक टन साखर, 0.075 मेट्रीक टन खतांची वाहतूक करण्यात आल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने दिली आहे. हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे अधिकारी अरविंद मालखेडे यांनी कोरोना काळातही उत्तम कार्य केल्याबद्दल सर्व कर्मचाऱयांना याचे श्रेय दिले आहे.