ऑनलाईन टीम / नोएडा :
नोएडामध्ये सेक्टर 29 मधील गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी मोठी आग लागली आहे. आगजनी कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही आग नक्की कशामुळे लागली आहे, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही तर नुकसानही काही झाले नसल्याची माहिती मिळत आहे. याबाबत माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमची टीम आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.