नवी दिल्ली : आगामी सणासुदीच्या काळात टेक कंपन्यांकडून दररोज नव नवीन उत्पादनांची बाजारात भर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. याचा लाभ ग्राहकांना अधिकचा घेता यावा यासाठी सदर कंपन्या अधिकच्या सवलतीही देत असल्याची माहिती आहे. यामध्ये आता नोकिया कंपनीने आपली नव नवीन उत्पादने बाजारात सादर केल्याची माहिती आहे.
नोकियाकडून नवीन सहा मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या टीव्हींचा मोठय़ा प्रमाणात विस्तार केला आहे. यामध्ये डिझनी प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि युटय़ूबसारख्या सिस्टमचा सपोर्ट असणार आहे. तसेच यामध्ये 48 वॉटपर्यंत आवाजाची सुविधा उपलब्ध होणार आहे.