डिजिटल प्लॅटफॉर्मवर मजबूत ठसा निर्मितीचे संकेत
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपला डिजिटल प्लॅटफॉर्म योनोला वेगळय़ा योजनेत बसविण्यासाठीचा विचार करीत असल्याचे संकेत बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिले आहेत.
बँक आगामी काळात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारे योनोला वेगळा सहाय्यक म्हणून समोर आणण्याची शक्मयता आहे. हा ऍप यू ओनली नीड वन ऍप यावर आधारीत योनो एसबीआय इंटीग्रेटेड बँकिंग प्लॅटफॉर्म राहणार आहे. यासाठी अन्य भागीदारांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती कुमार यांनी सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटर बँक फायनान्शिअल टेलिकम्युनिकेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या बँकींग ऍण्ड फायनान्स परिषद सिबोस 2020मध्ये दिली आहे.
साधारणपणे सदरची चर्चाही प्रारंभिक पातळीवर सुरु असल्याचेही सांगितले असून आतापर्यंत योनोचे मूल्य निश्चित करण्यात आले नाही. परंतु कुमार यांनी दिलेल्या संकेतानुसार मूल्य जवळपास 2.9 लाख कोटी रुपयांच्या आसपास राहणार आहे.
एसबीआयकडून आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्याच्या काळात योनोवर 26 दशलक्ष ग्राहकांची नेंदणी करण्यात आली आहे.