नोरा फतेही बॉलिवूडच्या आघाडीच्या नृत्यकलाकारांपैकी एक मानली जाते. तर गुरु रंधावा हा अत्यंत लोकप्रिय गायक आहे. दोघांच्याही खऱया आयुष्यातील रिलेशनशिपवरून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. नोरा आणि गुरु रंधावा यांना शनिवारी एका समुद्रकिनाऱयावर पाहिले गेले. दोघेही समुद्रकिनारी हिंडत एकमेकांसोबत वेळ घालविताना दिसून आले आहे. दोघांनाही एकत्र पाहून त्यांचे चाहते डेटिंगचा कयास व्यक्त करत आहेत. नोरा आणि गुरुच्या व्हायरल छायाचित्रांवर चाहते जोरदार कॉमेंट करत आहेत.
एका युजरने ‘नवे कपल’ असे म्हटले आहे. तर दुसऱया युजरने ‘चलो एक और परजाई मिल गई पंजाब नू’ अशी टिप्पणी केली आहे. नोरा आणि गुरु रंधावा खरोखरच परस्परांना डेट करत आहेत का एखाद्या म्युझिक व्हिडिओच्या चित्रिकरणातील छायाचित्रे व्हायरल झाली आहेत हे येणारा काळच सांगणार आहे.
नोरा आणि रंधावाने ‘नाच मेरी रानी’ म्युझिक व्हिडिओत एकत्रित काम केले होते. हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले होते. नोराने अलिकडेच संयुक्त अरब अमिरातमधील विडकॉन कॉन्सर्टमध्ये भाग घेतला हाता. तिच्या नृत्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.