प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुक्यातील शहाबाग येथून शाळेत जातो असे सांगून दोन शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाले असून याचा शोध वाई पोलीस, नातेवाईक घेत आहेत.
याबाबत वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सौ. सोनाली जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा किशोर विठ्ठल जमदाडे (वय 14) हा वाई हायस्कूलमध्ये इयत्ता 9 वीमध्ये शिकतो आहे. तो शाळेला जातो असे सांगून सकाळी त्याचा मित्र साजिद नुरमहमंद पठाण मुलाणी याच्यासोबत गेला. दोघेही परत आले नाहीत. त्यांची शोधाशोध केली असता सापडले नसल्याने वाई पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून किशोरचे वर्णन उंची 4.3 इंच, रंग गोरा, चेहरा गोल, नाक रुंद, डोळे बारीक काळे, बांधा सडपातळ, अंगात शेवाळी रंगावर पांढरे पट्टे असलेला शर्ट अन खाकी पॅन्ट, पायात प्लास्टिकची चप्पल, डोक्यात कानटोपी असे आहे. साजिदचे वर्णन उंची 5.5 इंच, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे, केस बारीक काळे, बांधा – सडपातळ, अंगात शेवाळी रंगाच्या शर्टवर पांढरे पट्टे आणि खाकी पॅन्ट आहे.