नोरा फतेहीला बॉलिवूडची डान्सिंग क्वीन या नावाने ओळखले जाते. अभिनेत्रीने स्वतःचे नृत्य तसेच लुक्सद्वारे चाहत्यांच्या मनात स्थान मिळविले आहे. नोरा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. नोराने अलिकडेच इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर्सचा आकडा ओलांडला आहे. चाहत्यांचे आभार मानत नोराने मोरक्कोमधून स्वतःची काही छायाचित्रे प्रसारित केली आहेत, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या छायाचित्रांवर सुमारे 19 लाख लाइक्स प्राप्त झाल्या आहेत.
नोरा फतेहीने स्वतःच्या नृत्याद्वारे चाहत्यांना घायाळ केले आहे. आता तिचे ‘जालीम कोका कोला’ हे भुज ः द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर सध्या गाजत असून चाहते तिच्या नृत्याचे कौतुक करत आहेत.
भुज ः द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नोरा ही हीना रहमान ही व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. हा चित्रपट 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तानच्या युद्धावर आधारित आहे. नोरा या चित्रपटात गुप्तहेराच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क आणि शरद केळकर हे कलाकार दिसून येणार आहेत.