ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेले नौसेनेचे ग्लायडर आज सकाळी केरळमध्ये कोसळले. या दुर्घटनेत दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे.
लेफ्टनंट राजीव झा आणि सुनीलकुमार पोएला अशी अपघातात शहीद झालेल्या दोन नौसैनिकांची नावे आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, नियमित प्रशिक्षणासाठी आयएनएस गरूडवरून नौसेनेच्या ग्लायडरने उड्डाण केले होते. सकाळी 7 वाजता हे ग्लायडर नौसेनेच्या तळाजवळ थोप्पुमपाडी पुलाजवळ कोसळले. दुर्घटनेनंतर लगेचच लेफ्टनंट झा आणि पोएला यांना उपचारासाठी आयएनएचएस संजीवनी येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ग्लायडर अपघातग्रस्त होण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघाताच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.