अयोध्या, तीन तलाकसंबंधी निर्णय देणारे न्यायाधीश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. अब्दुल नजीर बुधवारी निवृत्त झाले आहेत. राजकीयकदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील अयोध्या प्रकरण, तीन तलाक आणि खासगीत्वाच्या अधिकाराला मूलभूत अधिकार घोषित करण्यासमवेत अनेक ऐतिहासिक निर्णयांचा ते हिस्सा राहिले आहेत. 17 फेब्रुवारी 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झालेले नझीर यांनी स्वतःच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या याचिका अन् खटल्यांप्रकरणी निर्णय दिले आहेत. नजीर यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात वकिली केली होती. 12 मे 2003 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 24 सप्टेंबर 2004 रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते.