ऑनलाईन टीम / वेलिंग्टन :
न्यूझीलंडच्या मंत्रीमंडळात समावेश झालेल्या भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांनी नुकतेच मल्याळममध्ये भाषण केले. आयएएस अधिकारी नितीन सांगवान यांनी या भाषणाचे ट्विट केले आहे.
सांगवान यांनी या ट्विटमधील व्हिडिओला एक कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आपली भाषा, खाद्यसंस्कृती, राहणीमान ही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. तसेच आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतिक आहे.
41 वर्षीय प्रियांका या सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला होता. त्यानंतर मजूर पक्षाच्या वतीने त्या 2017 मध्ये संसदेत निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती झाली होती.