न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी व्यक्त केला संशय
प्रतिनिधी / मडगाव
मडग?ावच्या न्यू मार्केटमधील पहिल्या मजल्यावर शनिवारी रात्री लागलेल्या आगीवर लगेच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग कशी लागली हे स्पष्ट झाले नसले, तरी मेणबत्तीचा वापर करून या पॅसेजमध्ये काही जण पत्ते खेळत असतात. मेणबत्ती न विझविता तशीच ठेवल्यामुळे ही आग लागली असावी अशी शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
न्यू मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी वरील शक्मयता व्यक्त केली. काही जण येथे रमी आणि अन्य पत्त्यांचा खेळ खेळतात. तेथे उजेड नसल्याने मोबाइलचा प्रकाश वा मेणबत्तीचा वापर करण्यात येत असतो. शनिवारी अशा प्रकारे पत्ते खेळून झाल्यावर मेणबत्ती न विझविली गेल्याने वाऱयात ती पडून नजीक असलेल्या रद्दीच्या कागदांना आग लागली असावी. नंतर तेथील लाकडाच्या बाकडय़ाला आग लागल्याने धूर निघू लागल्यावर हा प्रकार नजरेस आला. लगेच अग्निशामक दलाला पाचारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्मय झाले. आगीची ठिणगी पहिल्या मजल्यावरून खाली पडली असती, तर आग भडकली असती व मोठा अनर्थ झाला असता, असे शिरोडकर यांनी सांगितले.
दरवाजाला दररोज टाळे ठोकावे
आपल्या नजरेस यापूर्वी पहिल्या मजल्यावर पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे नजरेस आले असता एक-दोन वेळा पोलिसांशी संपर्क साधून काही जणांना पकडले होते, याकडे शिरोडकर यांनी लक्ष वेधले. मडगाव पालिकेने हा प्रकार गांभीर्याने घ्यावा व पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या दरवाजाला दररोज टाळे ठोकले जाईल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी न्यू मार्केटला तीन-चार वेळा लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान व्यापाऱयांना सोसावे लागलेले आहे, हे शिरोडकर यांनी नजरेस आणून दिले.