दुबई
कोरोना व्हायरसग्रस्तांसाठी भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नूकरपटू तसेच 23 वेळा बिलीयर्डस् आणि स्नूकरमधील विश्वविजेतेपद मिळविणाऱया पंकज अडवाणीने पाच लाख रूपयांची मदत दिली आहे. देशातील कोरोना परिस्थितीची दखल घेऊन अडवाणीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीकरिता पाच लाख रूपयांची मदत पंतप्रधान निधीला दिली आहे. यापूर्वी क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केदार जाधव, अनिल कुंबळे तसेच टेबल टेनिसपटू जी.साथियान यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदत दिली आहे.