ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 हजार 996 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
एकूण 14,996 रुग्णांपैकी 10 हजार 213 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3617जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 5 लाख 61 हजार 121 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4372 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 113 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 15 जण व्हेंटिलेटरवर आहेत.