- 76 हजार 856 ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील दैनंदिन आकडे आणि मृत्यूंची वाढती संख्या धडकी भरवणारे ठरत आहेत. मागील 24 तासात तब्बल 8 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. काल 8,668 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 217 जणांनी आपला जीव गमावला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 लाख 59 हजार 268 इतका झाला आहे. तर कालच्या दिवशी 7,3249 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 लाख 71 हजार 494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 10 हजार 918 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 78 लाख 68 हजार 067 नमुने घेण्यात आले आहेत. यातील 62,910 नमुने काल एका दिवसात घेतले गेले. सद्य स्थितीत 76 हजार 856 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 9,652 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 324 जण व्हेंटिलेटरवर आहेत.