चंदिगढ
पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीने घरोघरी रेशन पोहोचवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही योजना ऐच्छिक असून कार्डधारक रेशन दुकानातूनही धान्य घेऊ शकतील असेही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. ही योजना सुरू केल्यामुळे राज्यातील आम आदमी पक्षाचे सरकार घरोघरी रेशन पोहोचवणार आहे. रेशनव्यवस्था बदलण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने डोअर स्टेप डिलिव्हरी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तयारी सुरु केली आहे.