ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 373 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 64 हजार 505 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 1,64,505 रुग्णांपैकी 1 लाख 54 हजार 433 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 260 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 37 लाख 62 हजार 120 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 812 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 96 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 12 जण व्हेंटिलेटरवर आहेत.