ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 617 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 693 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 935 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत एकूण 1,29,693 रुग्णांपैकी 1 लाख 21 हजार 155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 072 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 24 लाख 09 हजार 686 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 466 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 103 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 47 जण व्हेंटिलेटरवर आहेत.