ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 688 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 46 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच कालच्या दिवशी 1,383 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/Screenshot_20210616-2146402.png)
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 89 हजार 828 पोहोचली असून त्यातील 5 लाख 64 हजार 084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 15 हजार 698 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
- सद्य स्थितीत 10,046 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 01 लाख 88 हजार 326 नमुने घेण्यात आले आहेत. यातील 52,205 नमुने काल एका दिवसात घेतले गेले. सद्य स्थितीत 10 हजार 046 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 2,243 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 164 जण व्हेंटिलेटरवर आहेत.