बुधवारी 52 पॉझिटिव्ह : बेळगाव शहर-तालुक्मयातील 36 जणांचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या पंधरवडय़ात बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोना रुग्णसंख्येने दुसऱयांदा अर्धशतक पार केले आहे. बुधवारी जिल्हय़ातील 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 36 रुग्ण बेळगाव शहर व तालुक्मयातील आहेत. राणी चन्नम्मानगर, शहापूर व टिळकवाडी परिसरात रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण रुग्णसंख्या 27 हजार 427 वर पोहोचली असून यापैकी 26 हजार 862 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 20 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे तर 208 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 32 हजार 922 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 2 हजार 40 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. बुधवारी टिळकवाडी परिसरात कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले. शहापूर व राणी चन्नम्मानगर परिसरात प्रत्येकी 3, जाधवनगर, महांतेशनगर परिसरात प्रत्येकी 2 व निपाणीत 4 रुग्ण आढळले आहेत.
काकती, वैभवनगर, वडगाव, सदाशिवनगर, ओमनगर, अन्नपूर्णावाडी, पिरनवाडी, हनुमाननगर, शिवबसवनगर, महांतेशनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार 18 मार्च रोजी 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ पंधरवडय़ात 31 मार्च रोजी 52 नवे रुग्ण आढळून आले आहेत.