करिश्मा अन् करिनाकडून चित्रिकरणास प्रारंभ
करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांना यापूर्वी कधीच कुठल्याच चित्रपटात एकत्र पाहिले गेले नव्हते. पण चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. करिश्मा आणि करिनाने नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे.
स्टुडंट ऑफ द ईअर 2 चा दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवरून बेबो (करिना) आणि लोलो (करिश्मा) सोबतचे चित्रिकरणातील छायाचित्र शेअर केले आहे. बेबोसोबत काम करणे नेहमीच स्पेशल असते असे करिश्माने म्हटले आहे.
करिनाने अलिकडेच स्वतःचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी अभिनेत्रीच्या विरोधात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. पण करिनाने याप्रकरणी अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. करिना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा चित्रपटात दिसून येणार आहे.