माजी सरपंच बबन डिसोझा यांची मागणी
प्रतिनिधी / पेडणे
लॉकडाऊन काळ संपून महिना उलटला परत पंधरा दिवसाचा लॉकडाऊन काळ वाढवला. कोरोना संसर्गाच्या भीतीने सुरक्षितता म्हणून तालुक्मयातील व राज्याच्या अंतर्गत सीमाही सरकारने बंद केल्या आहेत. आता संसर्ग पसरवण्याचा धोका बराच कमी आहे. शिवाय सिंधुदुर्ग ग्रीन झोन असल्यामुळे सरकारने बांदा पत्रादेवी सीमा खुल्या कराव्यात अशी मागणी पत्रादेवी तोरेसे माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य बबन डिसोझा यांनी केली आहे .
पत्रादेवी सीमेवर असलेल्या बांदा बाजारपेठेवर ,पत्रादेवी , तोरसे , मोपा , तांबोसे , उगवे चांदेल हसापुर ,हाळी , फकीर फाटो या भागातील नागरिक बांदा बाजार पेठेवर अवलंबून असतात. या भागातील लोकाना पेडणे बाजारपेठे पेक्षा बांदा बाजार पेठ सोयीस्कर व जवळची वाटते . पेडणे बाजार पेठेत आवश्यक ते समान मिळत नाही तर बांदा बाजार पेठेत सर्वप्रकारचे चांगल्या प्रतीचे समान मिळते . त्यामुळे सरकारने बांदा पत्रादेवी अंतर्गत रस्त्यावरील गेट खुली करून बांदा बाजारात जाण्यास मुभा द्यावी अशी मागणी केली जात आहे .बांदा बाजारात जायला मिळत नसल्याने आम्हाला समान मिळवताना अनेक अडचणी येतात , आम्ही जगावे कसे असा प्रश्न आहे माजी सरपंच बबन डिसोझा आणि पत्रकार उमेश गाड यांनी विचारला आहे .