प्रतिबंधक लसीकरण न झाल्याने संघटनेचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेत शेकडो शिक्षकांचे मृत्यू झाले असतानाही राज्य सरकार शिक्षकांच्या बाबतीत दुर्लक्ष करताना दिसत आहे. अद्यापही अनेक शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस मिळालेले नाहीत. त्यामुळे पदवीपूर्व कॉलेजच्या शिक्षकांनी परीक्षांच्या मूल्यमापनावर बहिष्कार घालण्याचा विचार चालविला आहे. पदवीपूर्व शिक्षकांच्या संघटनेने तसा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
राज्य सरकार परीक्षा घेण्यासाठी विचारविनिमय करीत आहे. त्यामुळे परीक्षा व त्यांचे मूल्यमापन यांचे नियोजन करण्यापूर्वी सर्व शिक्षकांना लसीचे दोन्हीही डोस देणे गरजेचे आहे. परंतु जोवर डोस मिळणार नाहीत तोवर मूल्यमापनाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष ए. एच. निंगेगौडा यांनी दिला आहे.
मागील वषी परीक्षा तसेच मूल्यमापनाचे काम करणाऱया 11 शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. असाच प्रकार यावषी होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. राज्यात 23 हजारहून अधिक शिक्षक सरकारी व अनुदानित कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. तर 18 हजारहून अधिक विनाअनुदानित कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. दरवषी मूल्यमापनाची प्रक्रिया 20 दिवसांमध्ये पूर्ण होते. परंतु 2020 मध्ये तब्बल 54 दिवस यासाठी लागले होते. एकूण 18177 शिक्षक मूल्यमापनाच्या कार्यात राज्यभर कार्यरत होते.
डिजिटल मूल्यमापनाची अंमलबजावणी करा
कोरोनाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यामुळे यावषी मूल्यमापन करताना डिजिटल मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी संघटनेने केली आहे. यामुळे शिक्षकांची सुरक्षितता व वेळेची बचत होणार आहे. शिक्षकांना घरबसल्या मूल्यमापन करता येणार आहे. यासाठी बेंगळूर येथील राजीव गांधी युनिव्हर्सिटीच्या आरोग्य विभागाची मदत घ्यावी, असे संघटनेने म्हटले आहे/