प्रतिनिधी / मडगाव
मडगावचे एक प्रतिष्ठित नागरीक पद्मनाभ उर्फ पमा रघुनाथ हेदे यांचे अल्प आजाराने रविवार दि. 11 एप्रिल 2021 रोजी सकाळी पणजी येथे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांच्यावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी पुष्पा, पुत्र-सुना पराग / संध्या, मयुर / लिना तसेच नातु शौनक असा परिवार आहे.
मडगावच्या कोंब वाडय़ावर जन्माला आलेले पद्मनाभ हे ‘पमबाब’ या नावाने परिचीत होते. त्यांनी सेंट्रल बँक मध्ये नोकरी पत्करली होती व गोवा तसेच इतर राज्यात सेवा बजावली होती. निवृत्ती नंतर ते पणजी येथे स्थायिक झाले होते.
पमबाब हे जांबावली शिगमोत्सवात मोठय़ा उत्साहाने भाग घेत होते. तेथे सादर होणाऱया नाटकांत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. गणेश स्थवनाच्या वेळी ते ‘धन्य दिवस वाटला’ हा अभंग गायचे तसेच शिगमोत्सवात बॅन्ड वादन करणारे बेळगावचे बसवणाप्पा ब्रास बॅन्ड बरोबर ढोल वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी त्यांच्या निधन बद्दल शोक व्यक्त केला आहे. पद्मनाभ हेदे यांच्या जाण्याने आपल्याला दुःख झाले असे सांगून त्यांच्या कुटूंबीयांप्रती दिगंबर कामत यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ते एक उत्कृष्ट नट व गायक होते असे मडगावच्या आमदारांनी म्हटले आहे.