सोमवार पासून पेडणेत येणारे जाणारे सर्व माल वाहू वाहतूक बंद करणेच आवाहन ट्रक सबघटने कडून
पेडणे (प्रतिनिधी)
सोमवातर, दि 12 रोजी सकाळ पासून संपूर्ण दिवस पेडणेत येणारे व जाणारे माल वाहतूक गाडय़ा बंद ठेवण्याचे आवाहन पेडणे ट्रक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेटय़? यांनी केले आहे. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत वेगवेगळय़ा मार्गाने सरकारचे व मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधकाम कंत्राटदाराचा चा निषेध करण्यात येणार असून माल वाहतूक करणाऱया गाडय़ा मालकांनी तसेच विविध संघटनानी आम्हाला पाठिंबा द्यावा व आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
मोपा विमानतळ प्रकल्पात जे खडी, रेती आणि चिरे लागतात त्याची वाहतून करण्यासाठी आम्हाला वाढीव दर देवून आमच्या ट्रकाना कामधंदा ध्यावा , आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आम्ही आमच्या गाढय़ा रस्त्यावर उभ्या ठेवून सरकारचा निषेध केला . आता पुढे जावून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा पाचव्या दिवशी पोरस्कडे पेडणे येथे ट्रक मालक व्यावसायिक संघटना पेडणे यांनी दिला.
रविवार नईबाग पोरसकडे येथे आंदोलन कर्त्यांनी पत्रकारांना माहिती देताना मिलिंद शेटय़? बोलत होते, यावेळी मंगेश बागकर, उत्कर्ष तेली व अनेक आंदोलनकर्ते उपस्थित होते.
आज सकाळी पासून अनेक संघटनेच्या लोकांनी ट्रक संघटनेला आपला पाठिंबा त्या ठिकाणी येऊन दिला. व समर्थन केले, त्यात गोवा ट?क्सी संघटनेचे पदाधिकारी मोठय़ा प्रमाणात पोरसकडे येथे पोचले. कुडाळहुन ट्रक संघटना, अनेक एनजीओ चे पदाधिकारी उपस्थित राहिले . एकंदरीत हे आंदोलन आणखीनच पेटेल असे चिञ दिसत आहे.
एक बाजूने सरकार आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसऱया बाजूला आंदोलन तीव्र होत आहे. सरकार पाठिंबा देणाऱया सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यावर कारवाही करण्याच्या मार्गावर असतानाच आंदोलन करते आणखीनच आंदोलन तीव्र करणेच्या पविञ्यात आहेत. पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणिकर यांनी सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक याना नोटीसी बजावून सोमवार दि 12 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.
सरकाने या आंदोलनात हस्तक्षेप करून पेडणेतिल ट्रक मालकांना शांत करणेची गरज होती, ते न करता आंदोलन चिंगघण्यास प्रोत्साहन देणे योग्य नव्हे असे माजी जिल्हापंचायत सदस्य तुकाराम हरमलकर यांनी सांगितले .