2 कोटी 65 लाखांची 25 वाहने जप्त, दोघांना अटक
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्रसह गुजरात राज्यामध्ये ट्रक, टेम्पो व इतर चारचाकी वाहनांची थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी घेऊन या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱया टोळीचा पर्दाफाश करून उन्मेश उल्हास शिर्के (वय 48, रा. निरा ता. पुरंदर जि. पुणे) व अब्दुलकदीर मोहम्मद अली सय्यद (रा. सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोन भामटय़ांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 कोटी 65 लाख रूपये किंमतीची एकूण 24 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, संशयितांनी सातारा जिह्यातील 40 ते 45 आणखी वाहनधारकांची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची बाब तपासात पुढे येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सहपोलीस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक बन्सल म्हणाले, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये इंडो स्टार कॅपिटल फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेतून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंबे, ता. कोरेगाव) यांनी एक दहा टायर ट्रक फायनान्स कंपनीकडून कर्जाने घेतला. त्या ट्रकचे हप्ते थकित राहिल्यामुळे तो ट्रक उमेश उल्हास शिर्के (रा. निरा, ता. पुरंदर) यांनी ट्रकचे थकीत हप्ते भरून, त्यांना ठराविक रक्कम देऊन चालविण्यास घेतला होता. त्यानंतर मात्र उमेश शिर्के याने चव्हाण यांची फसवणूक केली. त्याबाबत चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुह्याचा तपास सुरू असताना अब्दुल कादिर सय्यद (रा. सुपा, ता. पारनेर) हा या गुह्यातील एक संशयित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम यांना त्याबाबत सूचना दिल्यानंतर पथकाने गतीने तपास करण्यास सुरुवात केली. कौशल्यपूर्वक तपास करून या गुह्यातील संशयितांना मुंबई, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, बुलढाणा, पनवेल, ठाणे, रायगड, सांगली, गोवा, गुजरात आदी ठिकाणावरून अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून 14 ट्रक, 7 छोटा हत्ती टेम्पो, 1 सुमो, 2 बोलेरो, 1 स्विफ्ट कार अशी 2 कोटी 65 लाख रुपयांची 25 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आणखी काही वाहने हस्तगत करण्याचे काम सुरू असून संशयितांनी जिह्यामध्ये आणखी 40 ते 45 वाहनधारकांना 4 ते 5 कोटी रुपयांना फसवले असल्याची बाब तपासात पुढे येत आहे.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाईक राहुल घाडगे, सुजित भोसले, दीपक इंगवले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला आहे.
पालघरवरून पोलीस अधीक्षकांना फोन
या टोळीतील मुख्य आरोपींनी फक्त सातारा जिह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर जिह्यातही अशीच फसवणूक केली आहे. यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक बन्सल यांना पालघरवरून एका वाहनमालकांचा फोन आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचीही अशीच फसवणूक झाली असून त्याने यांचा गुन्हा दाखल केलेला नाही. तरीही त्या व्यक्तीच्या वाहनांची माहिती घेऊन यामध्ये ते वाहन आहे का यांची माहिती घेण्यास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांना पोलीस अधीक्षक बन्सल यांनी सांगितले.