अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 27 जून 2021, सकाळी 11.15
● पॉझिटिव्हीटी दर 8.95 टक्क्यांवर ● शनिवारी अहवालात 977 बाधित ● 8,753 जणांचे नमुने तपासले● जिल्हय़ात 3,029 बेड रिक्त ● ऑक्सिजनसह 2,099 बेड रिक्त ● प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 1,808 रुग्ण ● शनिवारी 16,698 जणांना लस
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात जून महिन्यात संसर्गाचा आवेग ओसरला आहे. बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, कोरोनामुक्तीचा वेगही चांगला आहे. मात्र, जून महिन्यात बाधित वाढीचा आकडा तीन अंकावर स्थिर असून तो पुन्हा वाढण्याची शक्यता चिंता वाढवू लागली आहे. बाधित वाढीचा आलेख खालीवर होत असून, त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा दरही वाढत आहे. रविवारी बाधित वाढीचा आकडा एक हजार आला होता. मात्र, शनिवारी 977 एवढा आलेला आहे. यामध्ये 8,753 जणांचे नमुने तपासले असून, त्यामुळे या आकडेवारीनुसार पॉझिटिव्हिटी दर 8.95 एवढा आहे. दरम्यान जिल्ह्यात 3,029 बेड रिक्त असून, यामध्ये 2,099 ऑक्सिजन बेड आहेत.
दिलासादायक : 1,77,705 कोरोनामुक्त
जिल्हय़ात आजमितीस एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 90 हजार 462 एवढी असली तरी 1 लाख 77 हजार 705 जणांनी कोरोनावर मात करत लढाईला बळ दिले आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीचा वेग जिल्हय़ात दिलासादायक आहे.
जिल्हय़ात 3,029 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,837 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,808 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 3,029 बेड रिक्त आहेत. कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 87 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 261, ऑक्सिजनसह 2,099 बेड आणि ऑक्सिजनविना 587असे 3,029 बेड रिक्त आहेत.
शनिवारी 16,698 जणांना लस
जिल्हय़ात लसीकरणाचा वेग वाढू लागला असून उपलब्ध साठय़ानुसार लसीकरण सुरु आहे. लसीकरणाची आकडेवारी मंगळवारी गतीने वाढत असून मंगळवारी एका दिवसात 16 हजार 698 जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 3 हजार 897 झालीय. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 55 हजार 327 झाली असून एकूण लस घेतलेल्यांची संख्या 8 लाख 59 हजार 224 एवढी आहे.
शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 10,42,714, एकूण बाधित 1,90,462, एकूण कोरोनामुक्त 1,77,705, एकूण मृत्यू 4,321, उपचारार्थ रुग्ण-9,451
शनिवारी जिल्ह्यात बाधित 1005, मुक्त 511, बळी 18