ऑनलाईन टीम / पुणे :
नवक्षितिज आणि निटॉर इन्फो टेक यांच्या सयुक्त विद्यमाने मतिमंद व स्वमग्न यांचेसाठी पर्वती चढणे ही स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन जलदिंडी प्रतिष्ठानचश संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वास येवले व निटॉर इन्फो टेकचे चंद्रशेखर पोतनीस यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे व पुण्याबाहेरील मतिमंद व्यक्तींसाठी काम करणाऱया शाळा व कार्यशाळा अशा एकूण 20 संस्थांमधिल सुमारे 200 विशेष विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
स्पर्धेनंतर विजयी स्पर्धकांना डॉ.विश्वास येवले, निटॉर इन्फोटेकचे अमेप सांगेकर व पियुष आठवले सह्याद्री टेकर्सचे संस्थापक-विश्वस्त सुरेंद्र दुगड, झेप संस्थेचे राजाभाऊ पाटणकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, सत्तर वर्षांचे विशेष मित्र मिलिंद गडकरी यांचा पर्वती चढल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा देसाई म्हणाल्या, मुलांमधील आत्मविश्वास वाढावा व मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये जायची संधी मिळावी या उद्देशाने गेली 11 वर्षे नवक्षितिज संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाते.