ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी याबाबत कळवलं आहे. तसेच, शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हाव, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. विनायक मेटे 2015 पासून समितीच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते.
आपल्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होवो, अशी सदिच्छा व्यक्त करत या कामात माझी काही आवश्यकता भविष्यात भासल्यास माझे सदैव सहकार्य राहील, असं मेटेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.