प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवार दि. 22 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून सहा तालुक्मयात 1476 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्यापैकी 264 संवेदनशील मतदान केंदे आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.
रविवारी रात्री पोलीसप्रमुखांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पहिल्या टप्प्यात बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी तालुक्मयात मतदान होणार आहे. तर दुसऱया टप्प्यात सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्मयात मतदानाची प्रक्रिया होणार आहे. दुसऱया टप्प्यात सात तालुक्मयातील 1789 मतदान केंद्रांपैकी 234 मतदान केंदे संवेदनशील आहेत, असेही पोलीसप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हय़ात एकूण 3 हजार 265 मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतींसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी रविवार दि. 20 डिसेंबरच्या सायंकाळी 5 पासून दि. 22 डिसेंबरच्या सायंकाळी 5 पर्यंत, दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी दि. 25 डिसेंबरच्या सायंकाळी 5 ते 27 डिसेंबरच्या सायंकाळी 5 पर्यंत जिल्हय़ात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. मद्यविक्रीवर बंदी असणार आहे.
बेळगाव तालुका पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात येतो. बेळगाव वगळता तेरा तालुक्मयात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक पोलीसप्रमुख, एक अतिरिक्त पोलीसप्रमुख, सात पोलीस उपअधीक्षक, तेरा मंडल पोलीस निरीक्षक, 64 पोलीस उपनिरीक्षक, 132 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2710 हवालदार व पोलीस, 555 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सशस्त्र दलाच्या 18 व राज्य राखीव दलाच्या सहा तुकडय़ांचे बंदोबस्तासाठी नियोजन करण्यात आले आहे.
गुन्हेगारांवर कारवाई
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळय़ा यादीतील 513 गुन्हेगारांवर खबरदारीची उपाययोजना म्हणून कारवाई करण्यात आली असून जिल्हय़ात 28 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. 75 सेक्टरमध्ये बंदोबस्ताचे काम चालणार आहे. 150 सेक्टर अधिकाऱयांची पथके कार्यरत असणार आहेत. त्यांच्यावर देखरेखीसाठी सात पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुसूत्रपणे व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीसप्रमुखांनी दिली आहे.