वृत्तसंस्था/ कराची
पाकचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर आहे. पाक आणि यजमान इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 5 ऑगस्टपासून मँचेस्टर येथे सुरू होईल. या कसोटी मालिकेसाठी पाकच्या 20 जणांच्या चमूमध्ये फवाद आलमचा समावेश करण्यात आला आहे.
मिसबाह उल हकच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाक निवड समितीच्या बैठकीमध्ये 20 जणांचा संघ निवडला गेला. मिसबाह हा पाक निवड समिती प्रमुख आणि प्रमुख प्रशिक्षकही आहे. या कसोटी मालिकेसाठी इफ्तिकार अहमद, खुशदिल शहा आणि फक्र झमान यांना वगळण्यात आले आहे. पाक संघात हैदर अली हा एकमेव नवा चेहरा आहे. या मालिकेसाठी पाकचे नेतृत्त्व अझहर अलीकडे सोपविण्यात आले आहे.
पाक संघ- अझहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), अबिद अली, आसद शफिक, फईम अश्रफ, फवाद आलम, इमाम उल हक, इम्रान खान (सिनियर), कासिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, नसीम शहा, सर्फराज अहमद, शदाब खान, शाहिन शहा आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उसमान शेनवारी, वहाब रियाज आणि यासीर शहा.