ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानी संसदेत ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले. मात्र, यामागचे सत्य बाहेर आले असून, पाक संसदेत ‘मोदी-मोदी’ नव्हे तर ‘व्होटिंग-व्होटिंग’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
संसदेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री फ्रेंच उत्पादनांवर बंदी घालण्यासंदर्भात बोलत असताना बलुचिस्तानच्या खासदारांनी ‘मोदी-मोदी’ आणि आझादीच्या घोषणा दिल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. हे वृत्त चुकीचे असून, प्रत्यक्षात या खासदारांनी ‘व्होटिंग-व्होटिंग’च्या घोषणा दिल्या होत्या.
एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात शेअर केलेला व्हिडिओ समोर आला आहे.