अमेरिकेत कोरोना महामारी वाढण्यासह सायबर हल्लेखोरही वेगाने सक्रीय झाले आहेत. हे गुन्हेगार रुग्णालये आणि आरोग्य सेवांच्या नेटवर्कला गंभीर नुकसान पोहोचवित आहेत. एफबीआयसह दोन यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार आरोग्य सेवांशी संबंधित नेटवर्कमधून डाटा चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णलयांच्या नेटवर्कलाही नुकसान पोहोचवून उपचारात अडथळा आणू शकतात. मागील आठवडय़ात 5 रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले आहे. अशा शेकडो रुग्णालयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.
Previous Articleजर्मनीत कठोर निर्बंधाची तयारी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.