ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात खुर्रममध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) पाक सैन्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाक सैन्याचा कॅप्टन अब्दुल बासीत यांच्यासह 15 जवानांचा मृत्यू झाला. तर काही जवान जखमी झाले आहेत. तालिबानच्या दहशतवाद्यांनी पाक सैन्याच्या 63 जवानांचे अपहरण केल्याचेही सांगण्यात येते.
पाकिस्तानी लष्कराचे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरोधात खुर्रम परिसरात ऑपरेशन सुरू होते. या मोहिमेदरम्यान टीटीपीच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी जवानांवर हल्ला केला. कॅप्टन अब्दुल बासीत खान या कारवाईचे नेतृत्व करत होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बासीत यांच्यासह 15 जवान मारले गेले.