रुंदीकरणात रस्त्याच्यामध्ये येणार्या मंदिरामुळे वाहतुकीस धोका
वार्ताहर / पाचगाव
पाचगाव ते कंदलगाव गरुड तलावाकडून जाणारा रस्ता एक कोटी 40 लाख रुपये खर्च करून रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याच्याकडेला असणारे म्हसोबाचे मंदिर आता या रस्त्यात मध्येच येत आहे . यामुळे मोठे वळण तयार झाला आहे.
या वळणामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या मंदिराला लागूनच वडाचे लहान झाड आहे . वाहनचालकांना रस्त्याच्या मध्येच येणारे हे लहान मंदिर लक्षात येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
हे मंदिर केवळ दोन ते तीन फूट मागे घेतले तरी रस्ता वाहतुकीस सुरळीत होणार आहे. यामुळे तातडीने हे मंदिर मागे घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. आमदार ऋतुराज पाटील आणि नामदार सतेज पाटील यांच्या फंडामधून या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे.