प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा वॉर्ड क्रमांक 8 च्या विकासासाठी नगरसेविका मर्लीन डिसौजा यांना घरी पाठवा तेव्हाच म्हापशाचा खऱया अर्थाने विकास होईल. पाच वर्षात एकदाच वॉर्डात फिरकणाऱया उमेदवारांना घरी पाठविण्याची वेळ आली असून या वॉर्डात नागरिक बदल घडवून आणतील असे आवाहन गोवा फॉरवर्डचे आमदार किरण कांदोळकर यांनी केले.
कामरखाजन पेडे म्हापसा वॉर्ड आठ मध्ये ज्या समस्या आहेत त्या गेल्या पाच वर्षापासून संपलेल्या नाहीत. माजी नगरसेवकांना कधी शोधायला गेल्यास सापडलेला नाही. निवडणुकीवेळीच ते आढळून येतात. गेल्या महिन्यापूर्वी येथे नागरिकांचा डिव्हायडरची समस्या निर्माण झाल्या तेथेही ते झळकले नाही. लोकांची मागणी होती येथे फ्लायओव्हर करावा हे काम आमदाराचे असते. त्यापूर्वी हे काम जो लोकप्रतिनिधी आहे आमदार आहे त्याचे असते मात्र ते तेथे झळकलेच नाही. नगरसेवकही येथे झळकत नाही. सर्व आकय थिवी वासियांना येथे मोठा फेरफटका मारावा लागतो. विकास आरोलकरांना येथे मोठा प्रतिसाद मिळत आहे याचे कारण येथील नगरसेवक नागरिकांना नको आहे. त्याचबरोबर आमदारही नागरिकांना नको आहे. त्यापूर्वी नगरसेवकाला घरी पाठवा मग आपोआप आमदारही घरी जाईल अशी प्रतिक्रिया किरण कांदोळकर यांनी व्यक्त केली. हळदोणाच्या दोन वॉर्ड म्हापशाला लागतात त्यामुळे आपण येथे आलो. आमदारांना येथे अपयश आलेले आहे आणि येथील नागरिकांनी गो बॅक मर्लीन व गो बॅक आमदार असा नारा लावला आहे. म्हापसा वॉर्ड 8 च्या विकासासाठी नागरिकांनी विकास आरोलकरांना घरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन या प्रचारावेळी केले.