नवारस्ता/प्रतिनिधी
पाटण येथे एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे .दरम्यान पाटण पोलिसांनी या घटनेतील ९ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार पाटण येथील एका महिलेने 27 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 या दरम्यान तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेऊन तिला बाहेर फिरायला नेण्याचे, बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला बाहेर घेऊन जाऊन तिची पाटण व आजूबाजूचे परिसरातील लोकांशी ओळख करून देऊन त्यांचेशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. पाटण व आजूबाजूच्या परिसरातील आठ लोकांनी सदर अल्पवयीन मतिमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला आहे.
या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने पाटण पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ९ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पाटण पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.