प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कला व संस्कृती टिकविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. राज्यातील सर्व लूप्तपावलेल्या पारंपारिक कलांचे जतन केले जाणार आहे. कुठलीच कला लुप्त होणार नाही यांची जबाबदारी सरकार घेणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कला व संस्कृती खाते, कला अकादमी व क्रिडाप्राधिकरण व पच्छिम श्रेत्र सांस्कृतिक केंद उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमीच्या दर्यासंगमावर 21 व्या लोकोस्तवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
गेली 21 वर्षे कला व संस्कृती खाते चांगल्या प्रकारे हा लोकोत्सव साजरा करत आहे. यामुळे देशातील कलाकारांचा अविष्कार पहायला मिळत आहे. या लोकोत्सवामुळे देशाची संस्कृती ओळखायला मिळते. त्यामुळे देश विदेशातील लोक या कलेचा आस्वाद घ्यायला या लोकोस्तवात हजेरी लावतात. लोकोत्सवामुळे एक भारत श्रेष्ट भारतची प्रचीत येते व सर्वजण एकत्र येतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या लोकोत्सवामध्ये देशभरातील हस्तकारागिरांचे दालनाला व्रिकी करायला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असतो. त्यामुळे लोकोस्तवात दालने मिळविण्यासाठी धडपडत असतात. यात मोठय़ा प्रमाणात अर्थिक उलाढाल होते. देशातील सर्व कारागिरांच्या वस्तू या एकाच ठिकाणी उपलब्ध होतात त्यांना योग्य मार्केट मिळते. त्याच प्रमाणे खाद्याची दालने असतात. अनेक प्रकारचे रुचीक खाद्य या ठिकाणी मिळते. त्यामुळे हा लोकोत्सव प्रसिद्ध झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कला व संस्कृती देशाला जोडतेः कला व संस्कृती मंत्री
लोकोत्सव हा प्रसिद्ध असा उत्सव असून याची देशभरातील लोक आतुरतेने वाट पाहत असतात. 21 वर्षापूर्वी लावलेले हे लहानसे रोपटे आज मोठे झाले आहे. आज या लोकोस्तवाला मोठी प्रसिद्धी मिळत आहे. याचे श्रेय गोव्यात तसेच देशातून येणाऱया प्रेक्षकांना तसेच कलाकारांना जात आहे. या लोकोत्सवात 2500 कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. यात एकूण 16 राज्यांचे कलाकार सहभागी झाले आहे. तसेच संपूर्ण देशातील राज्यांचे हस्तकलांची दालने या ठिकाणी आहे. सर्वांनीं या लोकोस्तवाचा आस्वाद घ्यावा तसेच कुणालाही त्रास नकरता आपल्या वाहनांची योग्य रित्या पर्किग करुन लोकोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकरांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पच्छिम श्रेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष तनयराजसिंह सोडा, कला सचिव चोखाराम गर्ग उपस्थित होते. घडवंश शिमगोत्सव समितीतर्पे ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. कला व संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब यांनी आभार मानले.
लेकोत्सवात 780 स्टॉल्स आहे यापैकी 610 स्टॉल्स हे हस्तकलेचे आहे. दर दिवशी सुमारे 250 कलाकार विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे, रोज सायं. 6.30 कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दिवसभर हस्तकलेची तसेच अन्य दालने ग्राहकासाठी खुली असणार आहे. हा लोकोत्सव 19 जानेवारीपर्यत चालणार आहे.
बॉक्स करावे
क्रिडा गुणाप्रमाणे कलेचे गुण विद्यार्थ्यांना द्यावे यासाठी माझ्याकडे फाईल्स आली आहे. लवकरच शिक्षण खाते तसेच कला व संस्कृती खात्याची संयुक्त बैठक घेऊन यावर शिकामोर्तक केले जाणार आहे.