प्रतिनिधी/ पणजी
कौशल्य भारत हा भारताचा प्रमुख विषय आहे. कौशल्य भारत हे पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ध्येय असून आम्हाला ते साकार करायचे आहे. हेच ध्येय लक्षात घेत आम्ही दि. 15 एप्रिल पर्यत वार्तालाप इन्स्टिटय़ूट राज्यात अस्तित्वात आणण्याचे काम सुरु आहे. या इन्स्टिटय़ूटमध्ये उद्योजक क्षेत्रातातील जागस्तिक स्तरावरील तज्ञांची युवकांसाठी व्याख्याने असणार आहे. जेणेकरुन युवकांमध्ये असणारे कौशल्य अजून निखारुन येईल. तसेच यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्वोपरी आम्हाला मदत करत आहे. असे प्रतिपादन कौशल्य विकास व उद्योजक मंत्री विश्वजित राणे यांनी केले.
पणजी कला अकादमी येथे कौशल्य विकास व उद्योजक संचालनालयातर्फे ‘कौशल्य जागृताय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान प्रमुख पाहूणे या नात्याने मंत्री विश्वजित राणे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संचालनालयाचे सचिव सी. आर. गर्ग, संचालक दिपक देसाई, जीएसआयएचे दामोदर कोचकर, गोवा फार्मासिटीकल मॅन्युफॅक्चर्रस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण खुल्लर, व एनएसडीसीचे कॅप्टन कौस्तव नाथ उपस्थित होते.
आम्ही सर्वजण येथे एका वेगळय़ा दृष्टीकोनातून उपस्थित आहे. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना या क्षेत्रात यशाची शिखर गाठायची आहे, आणि हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ठ आहे. आमचे मुख्य ध्येय हे या क्षेत्रात रोजगाराची संधी निर्मान करणे, नविन उद्योजक तयार करणे यासाठी उद्योजक क्षेत्र वाचविणे हे काळाची गरज आहे. या क्षेत्रात यश गाठायचे आहे तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. तसेच या क्षेत्रात ज्यांनी आपल्या कामाच्या जोरावर नावलौकिक मिळविले आहे त्यांना प्रोत्साहन देणे तेवढेच गरजेचे आहे. असे मंत्री राणे यांनी अधिक माहीती देताना सांगितले.
मी उद्योजक क्षेत्रातुन आलो आहे, आमच्याकडे नेहमीच गोमंतकीय कामगारांचा अभाव असतो. त्यामुळे मला वाटते की उद्योजक क्षेत्र व आयटीआय यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. तरच हा अभाव आम्ही भरुन काढू शकतो. यादरम्यान आम्ही आयटीआयच्या मुलांना प्रशिक्षण देऊ शकतो ज्याच्या जोरावर ते आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतात. असे जीएसआयएचे दामोदर कोचकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी विविध स्तरावर आंतर आयटीआय झालेल्या विविध स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. दरम्यान विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आले.