साहित्य : पकोडा : 1 वाटी बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा ओवा, पाव चमचा बेकिंग सोडा, पाव चमचा मीठ, 12 पालक पाने, चाटः पाव वाटी दही, 4 चमचे चिंच चटणी, 4 चमचे ग्रीन चटणी, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा लाल तिखट, 1 कांदा चिरून, पाव वाटी बारीक शेव, 1 टोमॅटो चिरून, चिमुटभर मीठ, 2 चमचे कोथिंबीर चिरून
कृती : बाऊलमध्ये पकोडय़ाचे साहित्य घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून भज्याच्या पीठाप्रमाणे मिश्रण बनवावे. या मिश्रणात पालक पाने घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून पेपर नॅपकीनवर काढावे. तयार पकोडा ताटात मांडावेत. आता त्यावर 1 चमचा दही, चिंचेची चटणी, ग्रीन चटणी घालावे. वरून चाट मसाला, जिरेपूड, आमचूर आणि लाल तिखट घालावे. शेवटी शेव घालावी. वरून कांदा-टोमॅटो घालावा. पुन्हा वरून चटणी आणि कोथिंबीर टाकून खाण्यास द्या.