ऑनलाईन टीम/ पालघर :
पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. मागील दिवस डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. मात्र रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजून पाच मिनिटाच्या सुमारास या भागात भूकंप झाला. भूकंपाचा हा धक्का तलासरी मधील अच्छाड धुंदलवाडी आंबोली बहारे या भागात, तर डहाणू तालुक्यातील कासा सुर्यानगर धानीवरी ऊर्से या भागात जाणवल्याचीची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
फक्त पालघरच नव्हे तर, मागील काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोएडा येथेही 2.9 क्षमतेचा भूकंप आला होता. ज्याचे धक्के दिल्ली एनसीआर भागातही जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू नोएडापासून उत्तर- उत्तरपूर्वेला 37 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले होते.