ऍड. रमाकांत खलप यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेस पक्षाची राज्यात संघटनात्मक बांधणी करण्यासाठी एक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेश समिती, जिल्हा समिती आणि गटसमिती मिळून कालबाहय़ पद्धतीने संघटनात्मक बांधणी राज्यभरात करणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी काँग्रेस भवनात काँग्रेसचे राज्यप्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
या संघटनात्मक बांधणीचा निश्चित आराखडा बैठकीत ठरविण्यात आला असून त्या आराखडय़ानुसार पक्षाची पुढील वाटचाल होणार आहे. येणाऱया काळात होणाऱया पालिका निवडणुकांबाबत पक्षाची प्रदेश समिती आणि विधीमंडळ गट एकत्रित बसून धोरणात्मक निर्णय घेतील, असे खलप यांनी सांगितले.