प्रतिनिधी / सातारा
येथील गोडोली चौक ते देगाव फाटा ओव्हर ब्रिज मार्गावर दुपारी दोनच्या सुमारास एका मधधुंद टेम्पो चालकाने दोन दुचाकी स्वारास धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पिकअप टेम्पोच्या चालकास पोलिसांनी अटक केली असता तो दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे समोर आले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.