वार्ताहर / उसगांव
गावठण पिळये धारबांदोडा येथील श्री भुमिका देवी संस्थानच्या परिसरातील नवीन बांधण्यात येणाऱया देवदेवतांच्या मंदिरा प्रित्यर्थ जीर्णोद्धार निधी गोळा करण्यासाठी देणगी कुपन काढण्यात आली होती. त्याचा निकाल देवीच्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे शुक्रवारी मर्यादित स्वरुपात श्री भुमिका देवीचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शाणू गांवस, निऊ गावस, नरेश नाईक, उमाकांत गावडे व मोहनास गांवस यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी पत्रकार उमेश नाईक, धारबांदोडा पंचसदस्य विनायक गांवस, यशवंत बांदोडकर, संतोष गांवकर, उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. 30 दिवसांच्या आत आपली बक्षिसे घेऊन जावीत असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.